या वर्षांच्या सुरुवातीला फेसबुकची मालकी असलेल्या व्हाट्सअँप (WhatsApp) ने नव्या सेवा अटी आणि शर्ती आणल्या आहेत. जर तुम्ही या अटी-शर्ती अम...
या वर्षांच्या सुरुवातीला फेसबुकची मालकी असलेल्या व्हाट्सअँप (WhatsApp) ने नव्या सेवा अटी आणि शर्ती आणल्या आहेत. जर तुम्ही या अटी-शर्ती अमान्य केल्या तर तुमचं व्हाट्सअँप खाते (Account ) बंद करण्यात येईल. या अटी मान्य करण्यासाठी कंपनीने वापरकर्याना 8 फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली आहे.
नवीन धोरणात नक्की काय आहे?
नवीन धोरणात फेसबुक आणि इंस्टाग्रामचे एकत्रिकरण अधिक आहे आणि आता फेसबुककडे पूर्वीपेक्षा वापरकर्त्यांचा डेटा जास्त असेल. यापूर्वी व्हॉट्सअॅपचा डेटाही फेसबुकवर शेअर केला जात होता. पण, फेसबुकने व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामचे एकत्रिकरण अधिक होईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. व्हॉट्सअॅपच्या अद्ययावत धोरणात कंपनीला दिलेल्या परवान्यात काही गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत. त्यात नमूद केले आहे की आमच्या सेवा चालविण्यासाठी, आपण जगभरातील सामग्री अपलोड, सबमिट, संग्रहित करणे, पाठविणे किंवा प्राप्त करण्यासाठी व्हॉट्सअॅप वापरता, सामग्री वापरण्यास, पुनरुत्पादित करण्यासाठी, वितरण करण्यासाठी आणि प्रदर्शित करण्यासाठी, विना-खास, रॉयल्टी मुक्त. आणि हस्तांतरणीय परवाना द्या.
तसेच यात लिहिले आहे की, या लायसन्समध्ये तुम्हाला देण्यात आलेला अधिकार आमची सेवेसाठी संचालन आणि उपलब्ध करण्यासाठी समित उद्देशसाठी आहे.
आता वापरकर्त्यांकडे नॉट नाऊ (Not Now) हा पर्याय आहे
आता वॉट्सअँप वापरकर्त्यांना त्यांचे खाते सुरू ठेवण्यासाठी नवीन धोरण स्वीकारावे लागेल. याशिवाय वापरकर्त्यांकडे इतर कोणताही पर्याय नाही. तथापि, 'आता नाही' (Not Now) हा पर्याय अधिसूचनेत दिसत आहे. याचा अर्थ असा की काही काळ नवीन धोरण स्वीकारले नाही तरी, आपले खाते ८ फेब्रुवारी पर्यंत चालू राहील. आपले खाते सुरू ठेवण्यासाठी वापरकर्त्यांना नवीन धोरण स्वीकारावे लागेल. यासाठी वापरकर्त्यांना कोणताही पर्याय मिळणार नाही.
युजर्सच्या प्रायव्हसीचं काय?
व्हाट्सअँप (WhatsApp) च्या या नव्या धोरणांमुळे वापरकर्त्यांची प्रायव्हसी (Privacy) आता कायम राहणार नाही. व्हाट्सअँप (WhatsApp) आता वापरकर्त्यांची संपूर्ण माहिती आपल्याकडे ठेवणार आहे. यामध्ये कंपनीकडे प्रामुख्याने आपला आर्थिक डेटा साठवून ठेवला जाणार आहे. म्हणजेच आपल्या आर्थिक व्यावहारांवरुन आपण गरीब आहोत, श्रीमंत आहोत की मध्यमवर्गीय आहोत याची वर्गवारी केली जाणार आहे आणि या वर्गवारी नुसारच आपल्याला सोशल मीडियावर जाहिराती (Advertisements) दिसतील. (उदा. श्रीमंत युजर्सना त्यांच्या सोशल मीडिया पेजेसवर महागड्या गाड्या, गॅजेट्सच्या जाहिराती दिसतील). म्हणजेच कंपनी आता आपल्या डेटाचा वापर करुन अधिक पैसे कमावणार आहे.
व्हाट्सअँप (WhatsApp) वापरणा्यांना फेसबुकवर वैयक्तिक माहिती शेअर करावी लागेल
वैयक्तिक माहिती शेयर करावी लागणार हे ऐकल्यानंतर आपल्याला थोडेसे विचित्र वाटत असेल. पण व्हाट्सअँप (WhatsApp) ने आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून हे स्पष्ट केले आहे की नवीन प्रायव्हसीसी पॉलिसीअंतर्गत वापरकर्त्यांना त्यांचे व्हाट्सअँप (WhatsApp) तपशील फेसबुकवर शेअर करावे लागतील. ब्लॉगवर दिलेल्या माहितीनुसार, 'बरेच व्यवसाय आपल्या ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी व्हाट्सअँप (WhatsApp)वर अवलंबून असतात.
आम्ही वापरकर्त्यांशी संवाद सुधारण्यासाठी फेसबुक किंवा तृतीय पक्षाचा वापर करणार्या व्यवसायांशी जवळून कार्य करत आहोत. यासाठी, वापरकर्त्यांनी त्यांच्या व्यवहाराचा डेटा आणि आयपी कराराची माहिती सामायिक करणे बंधनकारक असेल. '
कोणत्या कंपन्या माहिती शेअर करतील?
व्हॉट्सअॅपच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीत फेसबुक (Facebook ) आणि इंस्टाग्रामचे (Instagram) इंटिग्रेशन जास्त आहे. आता युजर्सचा आधीच्या तुलनेत जास्त डेटा फेसबुककडे राहिल. आधीपासूनच व्हॉट्सअॅपचा सर्व डेटा फेसबुक सोबत शेयर केला जात होता. परंतु, कंपनीने स्पष्ट केले आहे की, फेसबुक सोबत आता व्हॉट्सअॅप (WhatsApp) आणि इंस्टाग्रामचे (Instagram) इंटिग्रेशन जास्त राहिल.
वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सअॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीवर विचार करण्याशिवाय पर्याय नाही. वापरकर्ते इतर फेसबुक कंपन्यांसह माहिती सामायिक न करणे निवडू शकतात. कंपनीने आपल्या FAQ मध्ये, घरातील कंपन्यांमधील डेटा सामायिकरण याबद्दल तपशीलवार माहिती सामायिक केली आहे. फेसबुक कंपन्यांमध्ये फेसबुक पेमेंट्स, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक टेक्नॉलॉजीज, ओनावो आणि क्रॉड टँगले या कंपन्यांचा समावेश आहे.


